चक्रेश्वरवाडी अश्मयुग ते वर्तमान याकाळाच्या प्रवासाचा इतिहासाचा मुकसाक्षीदार
-
चक्रेश्वरवाडी अश्मयुग ते वर्तमान याकाळाच्या प्रवासाचा इतिहासाचा मुकसाक्षीदार
निसर्गाने मुक्तहस्ताने ज्याचेवर सौंदर्याची उधळण केली, औदार्य दाखवलेला निसर्गाच्या संपन्नतेने नटलेला सुंदर मनोहारी अशी ओळख असणारा कोल्हापुर जिल्हा. कोल्हापुरच्या दक्षिणेस कोकणात फ़ोंडा घाटातुन जातानाच्या हमरस्त्यात राजर्षिंच्या दुरदृष्टीकोनातुन उभारलेल्या राधानगरी धरण परिसरापासुन सहा (6) कि. मी अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत चक्रेश्वरवाडी हे निवांत शांत टुमदार गाव डोंगरमाथ्यावर वसलेले आहे.
वर्तमानपत्रांमधुन मंदिराविषयी माहिती मिळाली. नेहमीप्रमाणे
भटक्यांना भटकंतीची आस लागते.
सतरा मे रोजी आम्ही कोल्हापुरहुन सुमारे साडे तीन - चार च्या सुमारास चक्रेश्वरवाडीत पोहोचलो गावाच्या मध्यावर रस्त्याच्या डावीकडे चक्रेश्वराचेहेमाडपंथी मंदिर लागते.
गावालगतच्या टेकडीवरील चक्राकार शिळांवरुनही या गावाचे नामकरण चक्रेश्वरवाडी झाले असावे.
गावाच्या मुख्यरस्तावरुन येणारा रस्ता थेट मंदिरात पोहोचतो
येथील मंदिर रचना
👉मुखमंडप, सभामंडप,अंतराळ व गर्भगृह
👉अशी असुन ते त्रिमुखी पुर्वाभिमुखी आहे.
👉मंदिराच्या सभामंडपात दिपमाळेकडे मुख असणारी गणेशाची मुर्ती असुन त्याचे दर्शन आपण मंदिरात प्रवेश करताना होते.
👉त्याच्या मागील तीन नंदी महादेवाचे पिंडीकडे तोंड करुन उभे आहेत.
👉गर्भगृहात रेखीव पिंड आहे.
👉सभागृहात भैरव, कार्तिक स्वामी. महिषासुरमर्दिनी,इ देवतांच्या मुर्ती आहेत.
👉येथे टप्प्यांची रचना असलेले शिखर आढळुन येते.
👉मंदिरासमोर सुबक अष्टकोनी हत्ती व घोड्याच्या मुखांनी अलंकृत गणेशाची मुर्ती असणारी दिपमाळ आहे.
प्रतिवर्षी चार – पाच मे रोजी कोवळे सुर्यकिरण शिवलिंगास स्पर्श करते. याच दिवशी शुन्य सावलीचा अनुभव दुपारी 12.30 वाजता दिपमाळेशेजारी घेता येतो.
♨️मंदिराच्या स्थापनेच्या काळात मुखमंडप खुला असावा कालांतराने त्याचेबाजुस भिंत घातल्याचे दिसुन येते या मुखमंडपातील व्दाराजवळील अस्पष्ट शिलालेखावरुन मंदिराचा जिर्णोद्धार वा बांधणी इ. स. 1499 मध्ये झाली असण्याची शक्यता आहे, मंदिर पंचायतन आहे.
♨️वाकोबा. विठठल-रुक्मीणी, महालक्ष्मी अशा देवतांची मंदिरे शेजारी आहेत.
♨️येथे महालक्ष्मी मंदिरात महासरस्वती, वीरभद्र, महाकाली सोबत सप्तमातृका असुन त्या वाहनांवर विराजित आहेत.
♨️मंदिराच्या डाव्या बाजुस वीरगळ, विविध पिंडी, जुनाशिलालेख तसेच गधेगळ आहेत. तसेच उजवीकडे वीरगळ, नागशिळा आहे.
👉पश्चिम महाराष्टातील प्रत्येक गावात वीरगळी, नागशिळा, सतीशिळा आढळतात.
👉कोल्हापुरच्या बीड व त्याच्या शेजारील गावात मोठ्या प्रमाणात वीरगळी आहेत.
👉गधेगळी या मात्र कोकण परिसरात आढळुन येतात. 👉त्यांचा कालखंड शिलहार राजवटीचा मानला जातॊ. 👉जो शिळेवरील विहीत केलेला नियम हुकुम यांचे पालन करणार नाही त्यांना दगडावर चित्रीत केलेप्रमाणे अभद्र शापवाणी (स्त्रि गधे मैथुन शिक्षा) वचने कोरली आहेत. अशा दोन गधेगळी या मंदिराच्या परिसरात आहेत.
👉मंदिराच्या उजवीकडे चौकोनी पुष्यकरणी असुन ती बारामहिने पाण्याने भरलेली असते तीच गंगाबाब. तेथुन पुढे भुंगिरा आहे (भुंगीरा म्हणजे जमीनी खालील गुहा)त्याचे उत्खनन झालेनंतर एतिहासिक पुराव्यात भर पडेल. या मंदिराच्या डावीकडे अदिलशाही शैलीतील दर्गा आहे. पुढे गावातील ग्रामपंचायतीसमोरील मैदानात दगडी गुंड्या आहेत (गोलाकार गोळ्यसारखे मोठे दगड) या होळी, गावातील जत्रा तसेच रंगपंचमी दिवशी गावातील लोक पाच सात अशा विषम संख्येत प्रत्येकी एका बोटावर उचलण्याचा प्रघात बरीच वर्षांपासुन चालत आलेला आहे. याची माहिती मंदिराचे सध्याचे पुजारी सुरेश गुरव यांनी दिला. त्यामागेही काही खास कारण असण्याची शक्यता आहे, जे आज कालऒघात विस्मृतीत गेले आहे.
तेथुन पुढे गावाच्या उत्तरेस साधारणपणे दिड कि. मी अंतरावर तपस्या गुहा आहे, स्थानिक बोलीभाषेत ती तपशाची गुहा अशी तीची ओळख आहे. आम्ही ही तपशाला भेट द्यायला गेलो तॊच तपस्या महायान लेणी समुह या समुहात सुरवातीच्या लेण्यात शिवलिंग असुन पुढील लेणी समुहात सुरुवातीस तीन ध्यान मग्न बुद्ध मुर्ती शेजारी एका राजाची (सम्राट अशोक) यांची मुर्ती, शेवटच्या लेण्यात बुध्द मुर्ती आहे ती सुस्थितीत आहे. तेथील उभी बुद्ध मुर्ती मात्र झिजलेने ओळखता येत नाही. लेणी समुहाच्या समोर स्तुप सादृश्य रचना आहे. उजवीकडे शंकराचे मंदिर आहे ही जागा गंगासागर महाराज यांचे मालकिची असुन त्यांची ही सातवी पिढी आहे. तपस्या लेणी समुह ही पोहाळे प्रमाणे सम्राट अशोक कालीन असावी. या लेणी समुहात तपस्येकरिता खास दालन असुन तेथे वायुविजनाची सोय आहे मात्र या दालनात दोन्ही बाजुने येणारा प्रकाश आत येत नसल्याने ही ध्यान साधनेकरिताचे सुंदर वास्तुकलेचे उदाहरण आहे. लेणी पाहुन होईपर्यंत सुर्यमावळतीकडे झुकल्याने आम्ही परत गावातील आडापर्यंत आलॊ तेथुन पुर्वेस असणा-या टेकडीवर शिळावर्तुळ पाहण्यास गेलो.
टेकडी चढुन खालुन दिसणा-या झाडाच्या खाली असणा-या मंदिराजवळ येऊन पोहोचतॊ यास छत नाही हे ठिकाण शिवालय म्हणुन ओळखले जाते. येथे दोन वर्तुळाकार दगड असुन त्यावर मेगलिथिक बांधकाम शैलीप्रमाणे (500BCE) दगडी रचना त्यावर वर्तुळ, कंकाळ, प्राणी मनुष्याकृती कोरल्या आहेत. तेथेच पुढे कोडबाव आहे, अभ्यासकांचे मते हे ज्वालामुखी मुख असावे गावातील प्रचलित दंतकथेनुसार या ठिकाणी पुर्वी ज्वालामुखी वाहत होती पुर्वजांनी येथे कपडे घालुन ती बंद केली कदाचित प्राचिन काळी ज्वालामुखी बाबत योग्य माहिती ज्ञात नसल्याने ज्वालामुखी थंड झालेनंतर ही कथा प्रचलित झाली असावी. पुढे या टेकडीवरील सर्वात उंच ठिकाणी शिलावर्तुळ आहे त्यावर उभे राहिल्यास आकाश धरणीला पुर्व – उत्तर ४० कि.मी. व दक्षिण-पश्चिमेस २५ कि.मी. अंतरावर असल्याचे भासते. अवकाश संशोधनाकरता ही जागा उपयुक्त असल्याचे अनेक खगोल शास्त्रज्ञांचे मत असुन त्याबाबत अभ्यास सुरु आहे. येथुन सुर्योदय सुर्यास्त अनुभवणे ही एक पर्वणीच आहे. शिलावर्तुळे म्हणजे दगड गोलाकार रचनेत मांडले जातात. अशी शिलावर्तुळे नागपुर, माहुरझरी इथे आढळली आहेत तेथे झालेल्या संशोधनानुसार ती अश्मयुगीन दफ़नभुमी असावी मृत व्यक्ती पुरल्यानंतर तेथे गोलाकार दगडरुपी स्मारक उभारले जायचे. हेही शिलावर्तुळ अश्मयुगीन स्मारक असावे.
अशाप्रकारे अश्मयुग, मोर्यकाळ, यादवकाळ ते आजअखेरीच्या इतिहासाचे चक्रेश्वरवाडी साक्षीदार आहे. तसेच चक्रेश्वरवाडी दुधगंगा व भोगावती नदीच्या मध्ये असुन येथुन कोकणात जाताना नदी पार करण्याची गरज नसल्याने हा जुना व्यापारी मार्ग असल्याचे वरील पुराव्यांनी अधोरेखित केले आहे. एकमात्र नक्की काळोघात प्रत्येक ठिकाणाचा वापर बदलत गेला. असा आहे अश्मयुग ते २०१९ या काळाचा मुकसाक्षीदार ………………………..
रवळनाथ - लोकदेव व क्षेत्रपाळ | थिंक महाराष्ट्र! यक्षदेवता व वीरयक्ष हेच दक्षिण कोकणात प्रामुख्याने ग्राम व नगर संरक्षक देव मानले जातात, ते गावाचे संरक्षण करतात ही लोकांची श्रद्धा आहे. यक्षोपासनेची चिवट परंपरा पिढ्यान् पिढ्या सातत्यपूर्ण चालू आहे. म्हणूनच भैरव (गस्ती करणारा) हा लोकप्रिय क्षेत्रपाल देव प्रसिद्ध आहे. त्याच्या कौल, नवस, गाऱ्हाणे, बळी या उपासनेतून गाव बांधिलकी असणे, अरिष्टापासून संरक्षण, कोपापासून कृपा, सुखसमृद्धी ही अपेक्षा नसते. त्याचा भर सौम्य रूपापेक्षा उग्र रूपावर अधिक असतो. त्याची उपासना आणि भक्तीसुद्धा भीतीतून अधिक होते. निसर्गाचे गूढ, पंचमहाभूतांचे वाटणारे भय आणि त्यांची अवकृपा होऊ नये म्हणून करण्याच्या उपासना... या प्रक्रियेमधून झटकन् पावणाऱ्या ग्रामदेवता, यक्षदेवता या दक्षिण कोकणात प्रसिद्ध पावल्या. शाक्तांनी त्यांच्या पंथात मूळ यक्षदेवास कोणताही बदल न करता सामील करून घेतले. द.ग. गोडसे म्हणतात, यक्षपूजेपासून शिवोपासना आणि शिवोपासनेतून त्यांच्या अनुचर देवता - भैरव, मल्हारी, खंडोबा, ज्योतिबा, रवळनाथ - यांच्या पूजा शिवकालात रूढ होत्या. यक्षपूजा ही तर आर्यपूर्वकालीन आ...
राजेचालुक्य/साळुंखे प्रतिष्ठान 26 May 2020 at 10:06 · Facebook for Android · दक्षिण कोकण व संगमेश्वर भागात विखुरलेली 👇 👇 👇 साळुंखे चाळुक्यांची वंशज घराणी ------------------- @........................ ✍️ सतीशकुमार सोळंके-देशमुख बादामी चाळुक्य साळुंक्यांचे थेट वंशज असलेल्या उत्तरकालीन कल्याण साळुंखे चाळुक्य वंशजांच्या संगमेश्वर राजवटीच्या अस्तित्वाच्या ऐतिहासिक नोंदी इ.सनाच्या तेराव्या शतकाच्या शेवटापर्यंत मिळतात. अलकनंदा वरुणा आणि शास्त्री या तीन नद्यांच्या संगमावर बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आणि त्या परिघात आजही कल्याण चाळुक्यांच्या अर्थात साळुंखे यांच्या संगमेश्वर राजवटीतील अनेक वंशजांची गावे अस्तित्वात असलेली दिसतात. राजे साळुंखे चाळुक्य यांचे तेराव्या शतकाच्या अंताला अथवा चौदाव्या शतकात संगमेश्वर राज्य गेल्यानंतर या घराण्यातील असलेल्या वंशजांनी त्यानंतरची मुस्लिमशाही, मराठेशाही आणि त्यापुढील काळात सरदार घराण्यात कन्व्हर्ट होऊन अनेक पराक्रमी इतिहास रचले. त्यानंतरच्या काळात त्यांनी अनेक युद्धाची मैदाने गाजवून आपल्या पराक्रमी मनगटी शौर...